चौधरी बंधु यांच्या बैठकीवर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष
दिनांक १५ रोजी सायं ४ वाजता तेली समाज कार्यालय भुसावळ येथे होणार निर्धार बैठक
भुसावळ प्रतिनिधि- दिनांक १५ एप्रिल २४ वार सोमवार रोजी रावेर मतदारसंघातिल राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या चौधरी समर्थक यांच्या निर्धार बैठक बैठकीकडे रावेर मतदारसंघासह संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. चला करूया निर्धार, संतोष भाऊंना करूया खासदार या ब्रिद खाली सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहनार असल्याची माहिती समोर येत आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादिचे कट्टर समर्थक व फायऱब्रांड नेते तसेच भुसावळचे शिल्पकार म्हणून ओळखले जानारे मा. संतोष भाऊ चौधरी यांनी पक्षाने उमेदवारी नाकारली असली तरी निवडणूक लढवावीविच अशी रावेर लोकसभा मतदार संघातील समस्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयत्यावेळी आयात उमेदवाराचे नाव जाहीर केल्याने मोठी नाराजी पक्षातील निस्ठावंतांकडुन व्यक्त केली जात आहे. आपल्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर निवडणूक लढवण्यासंदर्भात पुढील भुमिका ठरवण्यासाठी सोमवार दि.१५ रोजी निर्धार बैठकीचे आयोजन संतोषभाऊ चौधरी तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा अनिलभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.यावेळी मा संतोषभाऊकाय भूमिका घेतात हा मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून येत्या काळात एक नवीन राजकिय भूकंप होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.