रावेर मतदारसंघाबाबत खलबते सुरु झाल्याचि चर्चा
प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागताला उमेदवाराचिच दांडी
जळगाव प्रतिनिधी – कुंदन पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील आज जळगाव येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी पोहचले पन रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील मात्र स्वागतावेळि आलेच नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जळगाव जिल्ह्यातील नेत्यांमध्ये कमालीची कुचबुज याबाबत सुरु होती.
लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचे मतदान संपले आहे. महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला गेली. या मतदारसंघात नुकतेच भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व समर्थक प्रचंड नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी भुसावळ येथे भव्य सभा घेत व्यक्त केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतील ही खदखद दूर करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात दाखल झाले. परंतु ते आल्यावर रावेर लोकसभेचे उमेदवार विमानतळावर गेलेच नाही. तसेच बैठकीला सर्वात शेवटी दाखल झाले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका हॉटेल मध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा बैठकीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. परंतु पक्षाचे ज्या अधिकृत उमेदवारासाठी बैठक घेत आहेत ते रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील हेच बैठकीला सर्वात शेवटी उशिराने पोहोचले. या अगोदर जळगाव विमानतळावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जेव्हा दाखल झाले त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी इतर सर्व पदाधिकारी पोहचले. परंतु रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील हे पहायला मिळाले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी नाराजीचा सूर लावला. रावेर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी इच्छूक होते. परंतु या ठिकाणी भाजपमधून काही दिवसापूर्वी आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. जयंत पाटील हे आता जिल्हा दौऱ्यावर असतांना चौधरी बंधुना विश्वासात घेतात का? त्यांचि मनधरणी करण्यात यशस्वी होतात का ? कि एनवेळी निस्ठावंत कार्यकर्ते व जिल्ह्यात पक्षाला बळ देन्याचि ताकद असनारे संतोष चौधरी यांच्या नावावर पुनर्विचार करुन त्यांना एबि फोर्म देउन तगडि लढत रावेर मतदारसंघात उभी करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.