शरद पवार साहेब दि.३ मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर
महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शरद पवार साहेबांच्या सभांचे आयोजन
रावेर प्रतिनिधि- कुंदन पाटील, न्युज एमएच २४ तास. – महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे दिनांक ३ मे शुक्रवार रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत.
संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचि रनधुमाळि सुरु असताना महाराष्ट्र राज्यात देखील राजकीय वातावरण चांगलंच तापलंल आहे. जळगाव जिल्ह्यात देखील लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु असतांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादिचे खासदार मा.शरद पवार साहेब हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दिनांक ३ मे रोजी त्यांचा नियोजित दौरा असून जिल्ह्यात त्यांच्या तीन सभा होणार आहेत. सकाळी १०.२० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते ११.३० ते १ वाजेदरम्यान चोपडा येथिल सभेला ते उपस्थित राहतील. दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान भुसावळ येथे आयोजित सभेला ते संबंधित करतील. व सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान मुक्ताईनगर शहरात आयोजीत ते सभा घेणार आहेत. शरद पवार साहेबांच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेकांचे लक्ष लागून आहे.