कवियत्रि बहिनाबाई चौधरी,उमवि विद्यापीठातील वृक्षतोडीस तिव्र विरोध
विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकांसाठि ऍड कुणाल पवार यांचे कुलगुरू यांना ईमेल द्वारा निवेदन
जळगाव प्रतिनिधी- कुंदन पाटील, न्युज एमएच २४ तास- ऍड कुणाल पवार यानी कुलगुरू कबचौ उमवी यांना इमेल द्वारे निवेदन देत महात्वाच्या विषयांना वाचा फोडली आहे. त्यानी पाठवलेल्या निवेदनात ते म्हणतात कि, महोदय उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करतो की आपल्या विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक बसवल्या जातं आहे हि अतिशय आनंदाची बाब आहे पण त्यासाठी किती मोठी जुनी झाडें तोडली गेली याचा आपण सारासार विचार करावा तसेच माजी कुलगुरू कै प्रा सुधीर मेश्राम साहेब यांच्या काळात देखील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसविण्यासाठी ठरव संमत झाला होता पण आज परुंतु त्यांचे पुतळे स्मारक झाले नाही.
परंतु आपल्याला नम्र विनंती की आपण कवयित्री बहीणबाई चौधरी यांच्या स्मारक सोबत दोघी महामानव यांचे देखील स्मारक त्याठिकाणी उभारावे. आपण फक्त दोघी महामानव यांच्या जयंती पुरता त्यांना मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारणा देखील प्रत्यक्षात आणावे जेणे करून आपल्या विद्यापीठात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्मारक पाहून त्यांचे विचार आत्मसात करण्यास आणि देश हित जोपसण्यास अन्यायाच्या विरोधात लढण्यास प्रेरणा मिळेल हि नम्र आग्रहाची विनंती त्यांनि केलेली केलेली आहे.