अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते मोफत BMD क्यांप व सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन
*आदर्श बहुउद्देशिय संस्थेच्या सिकलसेलमुक्त महाराष्ट्र उपक्रमाचे विविध मान्यवरांकडून कौतुक*
रावेर प्रतिनिधी,- जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात असलेल्या डॉ.शब्बीर शेख यांचे मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आदर्श बहुउद्देशिय् संस्था व मेट्रो हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच आदर्श सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे. आज या शिबिरात BMD फ्री कॅम्प करण्यात आले. त्या साठी डॉ असिफ शेख भुसावळ अस्थी रोग तज्ञ् यांनी रुग्णांना तपासून मोफत औषधं उपचार केले. तसेच सिकलसेल ॲनिमिया रुग्नासाठी विशेष मोफत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. रावेर शहरातील या हॉस्पिटल मध्ये जिल्ह्यातील सर्व सिकलसेल रुग्नांसाठि हि ओपिडि मोफत असेल असे रुग्णालयाच्या वतीने घोषित करण्यात आले.याठिकाणी सिकलसेल आजाराच्या रुग्णांची संपूर्ण तपासणी व पाठपुरावा, तपासणी, सिकलसेल समुपदेशन एकाच छताखाली केले जाईल जेणेकरून पीडितांना भटकंती करावी लागणार नाही.
या सिकलसेलट्रिट्मेंट व रिह्याबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन आज दिनांक 22 जुन रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यावल रावेर मतदारसंघाचे मा अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदर्श संस्थेचे संस्थापकिय अध्यक्ष श्री मनोज पाटील यानी सांगितले कि आदर्श बहुउद्देशिय् संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सिकलसेल मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवत असून हजारो रुग्नांसोबत आम्ही काम करत आहोत. जळगाव सह महाराष्ट्रात सिकलसेल रुग्नांचि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आदर्श संस्थेने उभारलेल्या सिकलसेल ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून सिकलसेल ट्रिट्मेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या सहकार्याने सुरु करण्यात येत आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगरत्न दामोदरे यांनी केले.
आदर्श सस्थेचे सदस्य मोइनुद्दीन तडवि यानी सिकलसेल ॲनिमिया हा घाबरण्यासारखा आजार नाही, तो फक्त रक्ताची जन्मजात विकृती आहे. नियमित औषधे आणि आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण करूनच हा आजार आटोक्यात ठेवता येतो. नियमित चाचणीने, एखादी व्यक्ती संपूर्ण आयुष्य चांगले जगू शकते. त्यामुळे सर्व बाधितांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे *डॉ. शब्बीर शेख कदीर यांनी आपल्या भाषणात म्हटले कि, सिकलसेल रुग्णाना ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर च्या माध्यमातून मोफत समुपदेशन, मोफत औषधी, मोफत रक्तसंक्रमन, मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी या सेवा मिळणार आहे. सिकल सेल रुगनाची तपासणी व उपचार all is well हास्पिटल चे डॉक्टर शहाणावाज मलिक पेडिॅट्रिक हे दर शक्रवारी संध्याकाळी 4 ते 7 वाजे पर्यंत करतील असे सांगितले या रुग्नांसाठि मेट्रो हॉस्पिटल व आदर्श संस्था च्या माध्यमातून सिकलसेल रुग्नांसाठि सदैव कार्यरत राहील असे आश्वासित केले आहे.
*कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मा अनिल भाऊ चौधरी यानी आपल्या भाषणात यावल रावेर मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबविले जात आहे ही मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी खूप आनंदाची बाब आहे. असे म्हणत आदर्श बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज पाटील, व डॉक्टर शब्बीर शेख यांचे कौतुक करीत या मतदारसंघात गोरगरीब, दिव्यांग रुग्नांसाठि मि सदैव उभा आहे मतदारसंघातील प्रत्येकासाठी २४ तास आम्ही काम करत राहु असे आश्वासित केले. यावेळी ते बोलताना म्हणाले कि मनोज पाटील, नरेंद्र सपकाळे सारख्या तरुणांनि आदर्श संस्थाच्या माध्यमातून आरोग्यात जे काम उभे केलेय त्याबद्दल परमेश्वर त्यांना दिर्घायुष्य देओ व कायम गोरगरीबांचि सेवा त्यांच्या हातुन होवो.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान मा अनिल भाऊ चौधरी तर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद. माजी नगराध्यक्ष गोटू सेठ.हरीश गणवानी. नगरसेवक असिफ मोहम्मद माजी नगरसेवक मुताल्लीब भाई. प्रहार जनशक्ती वैद्यकीय आघाडीचे जळगाव महानगराध्यक्ष श्री नरेंद्र भाऊ सपकाळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मेहमूद हाजी,राष्ट्रवादी किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान दादा पाटील, मुस्लिम पंच कालू पहेलवान, गयास भाई, युसूफ भाई, अड दाणगे, अड एस एस सय्यद, अरिफ भाई. डॉ अब्रार दंत रोग विशेषतज्ञ् , डॉ रुबीना शेख स्त्री रोग विशेषतज्ञ्,डॉ हुझेफा शेख समीर शेख मॅनेजजिंग डायरेक्टर. व रावेर शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी हॉस्पिटल चे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले