जळगांव प्रतिनिधी- नरेंद्र सपकाळे
शहरातील प्रहार जनशक्ती पक्षातर्फे “सिग्नलला पहा आणि फुले वाहा” असे अनोखे आंदोलन आज ख्वाजामियाँ चौकात करण्यात आले. जळगाव शहरातील बहुतांश बंद ट्राफिक सिग्नल सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महापालिका प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत अपेक्षित अशी कार्यवाही झाली नसल्याने आज मंगळवारी २३ जुलै रोजी दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ख्वॉजामियॉ चौकात बंद असलेल्या “सिग्नलला पहा आणि फुले वाहा” असे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला.
दुभाजका मधील झुडपांच्या अमर्यादित वाढीमुळे होतोय अपघात…
या ठिकाणी प्रहार पक्षाच्या वतीने लक्षात आणून दिले की, शहरातील दुभाजकामधील झुडपांची अतिरिक्त वाढ झाल्याने पलिकडिल रस्त्यावरून येणारे वाहन नजरेस पडत नाही व त्यामुळे अपघात घडत आहे, त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व दुभाजकांच्या मधील झुडपांची छाटणी करावी ज्यामुळे अपघात घडणार नाहीत अशीही मागणी पक्षातर्फे करण्यात आली
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजीभाऊ सोनवणे, युवक अध्यक्ष श्री. दिनेशभाऊ कोळी, शहर अध्यक्ष श्री. प्रवीणभाऊ पाटील, महिला आघाडीच्या सौ. नीता राणे मॅडम, वैद्यकीय आघाडीचे महानगराध्यक्ष श्री.नरेंद्र सपकाळे, दिव्यांग सेलचे महानगराध्यक्ष श्री. नितिन सूर्यवंशी, शहरउपाध्यक्ष श्री.पंकज पवार, परेशभाऊ नेवे, मजीदभाई अली, दत्तूभाऊ कोळी, राहुलदादा इंगळे व अन्य कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते.