महाजन आश्रम शाळेत सिकलसेल जनजागृती अभियान अंतर्गत विद्यार्थी चाचणी अभियान संपन्न
भडगाव मध्ये सर्व आश्रम शाळांत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम चाचणी व जनजागृती सर्वदूर सुरु
भडगाव प्रतिनिधी – महाजन आश्रम शाळेत सिकलसेल जनजागृती अभियान अंतर्गत विद्यार्थी चाचणी अभियान संपन्न
गुढे येथील स्व. सौ. बहिणाबाई धनाजी महाजन अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत दिनांक 27/ 6/ 2024 रोजी आदिवासी विकास विभाग नाशिक,अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालय व भडगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल जनजागृती सप्ताह अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची सिकल सेल चाचणी करण्यात आली . तालुका आरोग्य अधिकारी श्री समाधान वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाचणी अभियान राबविण्यात येत आहे. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र गुढे येथील आरोग्याधिकारी श्री. डॉ.नरेंद्र पाटील सर श्री .डॉ. नितीन सोनवणे सर व श्री मनोज पाटील सर ,(जिल्हा सिकलसेल समन्वयक) व प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शाळेतील 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सिकलसेल चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित डॉक्टरांचे व कर्मचारी वर्गाचे शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक, पर्यवेक्षक यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक श्री किशोर शिंपी सर यांनी केले.
शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे सिकलसेल पंधऱवाडा सुरु असून दररोज वेगवेगळ्या पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण तालुक्यात सुरु आहेत. यासाठी तालुक्यातील श्री मनोज पाटिल व सर्व टिम तसेच आदिवासी विभागाच्या सर्व शाळेच्या शिक्षक, अधीक्षक यांची टिम जोमाने काम करत आहे.