जळगाव प्रतिनिधी-कुंदन पाटील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातिल राष्ट्रीय आरोग्य अभियाना संदर्भात तसेच इतर विभागाबाबत जिल्ह्यातील नामांकित माहिती अधिकार कार्यकर्ते तथा शासकीय आरोग्य यंत्रणा अभ्यासक म्हणून परिचित असलेले श्री दिनेश भोळे गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातिल भ्रष्टाचाराचे पायमुळ काढण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. या विभागात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. यासाठी गेल्या वर्षापासून त्यांचे प्रशासनाकडे प्रलंबित असणारे विविध प्रकारचे माहिती अधिकार त्याचप्रमाणे चौकशी, तक्रारी याबाबत कोणतेही उत्तर प्रशासनाकडुन मिळत नसल्याने त्यानी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. ४२ डिग्री सेल्सियस च्या वर सध्या जळगाव येथील तापमान असतांनाहि भ्रष्टाचाराविरोधी मोहीम त्यानी हाती घेत मांडलेला ठिय्या जिल्हाभरासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत होता. परंतु प्रशासनातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या अनागोंदी, मनमानी, अनास्थेपना मुळे प्रशासन त्यांना माहिती पुरवु शकत नाही हे जिल्ह्या आरोग्य अधिकारी यंत्रनेचे दुर्दैव या निमित्ताने समोर आले. अखेरीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यानी या बाबत खेद व्यक्त करित श्री दिनेश भोळे यांना विनंती करत त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे म्हणत कार्यालयीन वेळेत त्याना सर्व माहिती अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येइल व त्यातील सर्व प्रति विनामूल्य देन्यात येतील असे लेखी आश्वस्त केले.
यावेळी जिल्ह्यातील केलेले अनेक गैरप्रकार तत्काळ थांबविन्याच्या सुचना देखील भोळे यानी प्रशासनास केल्या आहेत. व त्या मान्य करण्याच्या व मागितलेली संपूर्ण माहिती देन्याच्या अटिवर सदरील उपोषण तुर्तास स्थगित करन्यात आले आहे. यावेळी दिनेश भोळे यांच्यासह नरेंद्र सपकाळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयवंत मोरे, जिल्हा परिषदेचे बहुउद्देशिय कर्मचारी जयंत पाटील व इतरही अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा