ब्रेकिंग
चाळीसगाव बहाल येथे देखील जागतिक सिकलसेल दिन साजरा
चाळीसगाव न्युज एमएच २४ तास- आज १९ जुन जागतिक सिकलसेल दिनाचे औचित्य साधत चाळीसगाव तालुक्यात सर्व आरोग्य केंद्रांवर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार व तालुक्यातील सिकलसेल यंत्रनेच्या माध्यमातून विविध जनजागृतीस्पर कार्यक्रमाचे आयोजन केलेले असताना आयुष्यमान आरोग्य मंदिर बहाल 1 येथे देखील जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्राच्या निगडित सर्व संशयित सिकलसेल वाहक यांच्या परिवारातील सदस्य तसेच संशयितांचि आरोग्य तपासणी करून सिकल सेल अनेमिया आजार विषयी त्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर नेहा महाजन आरोग्य सेविका जे एस मोरेआशा सेविका शोभा चौधरी, सारिका चौधरी उपस्थित होत्या.