*जागतिक सिकलसेल दिनानिमित्त चाळीसगाव भडगाव तालुक्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन*
देवळी आश्रम शाळेतील विद्यार्थीच्या सिकलसेल चाचण्या शिबीराचे आयोज
न्युज प्रतिनिधी, सुशांत जाधव, चाळीसगाव – १९ जुन जागतिक सिकलसेल दिना निमित्ताने सिकलसेल जनजागृतीचे उद्दिष्ट समोर ठेवत संपूर्ण चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात विविध प्रकारे जनजागृती व चाचणी शिबिर आयोजित तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार करण्यात आले होते.
त्याचाच भाग म्हणून चाळीसगाव तालुक्यातील नानासो उत्तमराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमीक व उच माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे सिकलसेल चाचणी शिबिर व शिक्षाकाना सिकलसेल आजाराची माहितीस्पद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या शिबिरामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सिकलसेल हिमोग्लोबिन तपासण्या करण्यात आल्या यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ह्रितिक पाटील सिकलसेल समन्वयक श्री मनोज पाटील, आरोग्य सहाय्यक श्री ममराज राठोड, पिएमडब्ल्यु श्री धनंजय जाधव, प्रा.आ.केंद्र उंबरखेड चे आरोग्य सहाय्यक एस.एन नागरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळासाहेब पाटील, डॉक्टर मोनिका चव्हाण, आरोग्य सेवक हेमंत चौधरी, आरोग्य सेविका श्रीमती सपना जवराज, बाबळे सिस्टर, मलेरिया सुपरवायझर श्री किरण बेलदार, एमपि डब्ल्यु राठोड जितेन्द्र, स्वप्नील जोगदंड, पंकज अहिरे, आशा सेविका छाया सूर्यवंशी, बबिता पाटील, मनीषा पाटील. प्र. तंत्रज्ञ स्वप्नील नाईक, महाल्याब चे कर्मचारी श्री शिरसाठ, राठोड यांच्या सह शाळेतील मुख्याध्यापक तुषार खैरनार सर व इतरहि शिक्षक वृंद उपस्थित होते.