जि.प. च्या उर्मट कंत्राटी कर्मचारीचा फोटो व्हायरल..
भ्रष्टाचार विरोधात सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांचे प्रशासनाला ठिय्या आंदोलनाचे पत्र .
कुंदन पाटील, जळगाव प्रतिनिधी- जळगाव येथील आरोग्य विभागातील शासकीय योजनांचे अभ्यासक, सामाजिक तथा जन माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेशजी भोळे यांनी त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वरती २ दिवस अगोदर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील काहि अधिकारी वर नाव न घेता प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याबाबत जिल्ह्यातील अनेक कर्मचारी दिनेश भोळे यांच्या संपर्कात असतांनाच आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचारीचा टेबलला पाय टेकवत असलेला उर्मट फोटो व्हायरल झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनातील हा फोटो असून टेबलवर पाय टेकवून बसलेली जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (कंत्राटी कर्मचारी) डॉक्टर पंकज शिंपी हि व्यक्ती असल्याचे दिसत आहे. याच पंकज शिंपी या कर्मचारी विरूध्द सिकलसेल किट घोटाळा, पदभरति घोटाळा, कंत्राटी कर्मचारी यांच्या अवैध बदली घोटाळे, १५ वित्त आयोगातिल खरेदी घोटाळा, औषधी घोटाळा, बनावट सहि तक्रारी, उर्मट व दादागिरी करणे, कर्मचारी विरूध्द राजकीय दबाव यंत्रणा वापरणे, कर्मचारीना ब्ल्याकमेल करणे, वरिष्ठ स्तरावरील अधिकारी याना खोट्या माहिती देणे, कर्मचारीवर बाहेरील जिल्ह्यातील पुढार्यांचा दबाव आणणे स्वतः च्या पदाचा गैरवापर करणे अशा अनेक गंभीर तक्रारी असून त्याबाबत कोणतेही प्रकारच्या कार्यवाही प्रस्तावित का केली जात नाही असे अनेक प्रश्न असतांना थेट जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात त्यांचे अशा प्रकारचे एटित फोटो
पाहता नेमके कुनाच्या वरदहस्त याकडे आहे..? का जिल्हा आरोग्य अधिकारी यावर कार्यवाही करत नाहि ? असे प्रश्न संपूर्ण जिल्ह्याला लागुन आहेत. मात्र या मुळे जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली असून अशा मानसिकरोगी स्वरूप वागणाऱ्या कर्मचारी वर त्वरित कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
यातच दिनेश भोळे हे सातत्याने अनेक महिन्यापासून भ्रष्टाचाराबाबत माहिती अधिकार कायद्यानुसार रीतसर माहिती मागत असतांना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय त्यांना जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे व त्यांच्यावर वेगवेगळ्या पध्दतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप दिनेश भोळे यानी केला असून त्यानी प्रशासनाला पत्र देत आता ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कार्यभारावर संपुर्ण जिल्हा नाराजी व्यक्त करत आहे.