ब्रेकिंग
पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पारदर्शकपने करण्याचि केली विनंती
भुसावळात न्यु सातारा एरियात झालेल्या हल्याप्रकरणी नागरिकांनि दिले निवेदन
- जळगाव प्रतिनिधी- प्रति, आज भुसावळ मधील सराईत गुन्हेगाराबाबत पारदर्शक पध्दतीने तपास करणे बाबत नागरिकांनि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. ज्यात अनेक नागरिकांच्या सह्या असून त्यात ते म्हणतात कि, पोलीस महानिरीक्षक साहेब, घटनेची थोडक्यात हकीकत फिर्यादी व आरोपी हे एकाच वार्डात रहात असून आरोपी हे फिर्यादी कडे नेहमीच बेकायदेशीर पैशाची मागणी करत असत, दिनांक ३/५/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास त्याच्या भाऊ सुरज सोबत जात असताना आरोपीने फिर्यादी कडे पैशाची मागणी केली व त्यास फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने त्यांना गाडी वरून खाली पाडले व विड्या सारख्या लोखंडी टोकदार हत्याराने व बर्फ फोडण्याच्या टोकदार टोच्याने फिर्यादी व त्याच्या भावावर प्राणघातक हल्ला केला तसेच फिर्यादीच्या गळ्यातील १२.५ ग्रॅमची ७०५१५/- रूपये किमतीची सोन्याची चैन हिसकावुन घेतली. त्यामुळे भा.द.वि. कलम ३९४,३८४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यात आरोपीस त्याच्या पत्नीने देखील सहकार्य केलेले आहे व ती आज रोजी फरार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. आरोपी यास दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यास दिनांक ६/५/२०२४ रोजी न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात पोलीसांची भुमिका संशयास्पद वाटत आहे,कारण इतक्या गंभीर गुन्ह्या मध्ये पोलीसांनी फक्त दोन दिवासाची पोलीस कोठडीची मागणी व ज्या कारणासाठी पोलीस कोठडी मागणी करण्यात आली होती त्यामध्ये कोणतीही प्रगती बसताना खोटा मुद्देमाल जप्त करून घेऊन आरोपीची न्यायालयीन कोठडीची मागणी केली असून आरोपीना पोलीसांचे अभय असल्याने गुन्ह्यातील आरोपी क्र.२ ही अद्याप फरार असून तिला अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनने कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसुन येत नाही. पुढे ते निवेदनात म्हणतात कि, सदरील आरोपी हे सराईत •गुन्हेगार असून पोलीसांच्या भूमिकेमुळे लवकरच आरोपी हां तुरुंगातुन बाहेर येईल व तसे झाल्यास त्याच्या मनात माझ्या व माझ्या कुटुंबीयां बद्दल राग असल्याने तो आमचा घातपात करण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही दहशतीच्या वातावरणात वावरत आहे. सदर गुन्ह्याचा सखोल व योग्य पास्दर्शक पध्दताने तपास होणे अपेक्षित आहे जेणे करून आरोपीना कडक शिक्षा झाल्यास गुंड प्रवृत्तीला आळा बसून कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यास मदत होईल. आरोपीची वार्डात दहशत असल्याने तसेच वार्डातील लोकांना आरोपींचा त्रास असल्याने यार्डातील बरेच लोक आरोपीच्या जाचाला कंटाळले असल्याने लोकांनी आरोपीस कडक शासन व्हावे
म्हणून या अर्जावर त्याच्या मर्जीने सह्या केलेल्या आहे. तरी ते प्रशासनास विनंती करत आहेत कि आमच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधीत पोलीस अधिका-याला पारदर्शक पध्दतीने सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सुचना देऊन न्याय द्यावा. निवेदन देते वेळी नागरिकांनि पोलिस स्टेशन जळगाव येथे अनेकांची उपस्थिति होती.