ब्रेकिंग
अनिलभाऊ चौधरी यांनि केली नुससानग्रस्त शेतीचि पाहणी
पंचनामे करून त्वरित मदत करण्याचि केली प्रशासनास मागणी.
ऱावेर प्रतिनिधी- कुंदन पाटील, रावेर तालुक्यात मौजे दोधे, नेहते, आटवाडे येथे काल झालेल्या वादळी पावसामुळे शेतीमध्ये केळी पिकाचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रहार उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यानी आज येथील नुकसानझालेल्या शेती भागाची संपूर्ण पाहण केली. तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणीव घेतल्यात. व मा.तहसिलदार साहेब तसेच संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची विनंती केली. बळीराजाला सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात मदत करण्याचे आश्वासित यावेळी अनिल भाऊ चौधरी यानी प्रहार च्या वतीने केले.
या वेळी दोधे सुनील पाटील, दोधे सरपंच गोपाळ महाजन, आटवाडे सरपंच किरण कोळी, गणेश बोरसे, थेरोळा सरपंच शुभम पाटील, रामचंद दांडगे, अविनाश कोळी, वसीम शेख व इतर शेतकरी मंडळी त्यांच्या सोबत होती.